Psalms 74

1हे देवा, तू आम्हाला सर्वकाळ का सोडून दिले आहेस?
आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?
2तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली,
जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे,
व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.

3पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या,

शत्रूने सर्व पवित्रस्थानाचे कशी नुकसान केले आहे ते पहा.
4तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत;
त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.
5जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या
माणसाप्रमाणे ते त्यांना दिसले.
6त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने
सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.

7त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली;

जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
8ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू.
त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.

9आम्हाला देवाकडून कोणतेही चिन्हे मिळाले नाही. कोणी संदेष्टा उरला नाही;

असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
10हे देवा, शत्रू किती वेळ अपमान माझा करील?
शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
11तू आपला हात, आपल्या उजवा हात का मागे आवरून धरतो?
तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?

12तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे,

पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला;
तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.

14तू लिव्याथानाचे मस्तक ठेचले;

रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
15तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले;
तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.

16दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे;

तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
17तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठतविल्या आहेत;
तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.

18हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे

आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर
19तू आपल्या कबुतराचा जिव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस.
आपल्या दडपशाहीचे जिवन सर्वकाळ विसरू नकोस.

20तू आपल्या कराराची आठवण कर,

कारण पृथ्वीवरील काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत.
21दडपलेल्यास शरमिंदा होऊन मागे फिरू देऊ नको;
गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.

22हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर;

मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर.
तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको
किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.
23

Copyright information for MarULB